Friday, November 22, 2024
Homeजुन्नरनॅशनल अबॅकस स्पर्धेत शिवमुद्रा इन्फोटेक प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे सुयश

नॅशनल अबॅकस स्पर्धेत शिवमुद्रा इन्फोटेक प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे सुयश

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथील शिवमुद्रा इन्फोटेक प्रोऍक्टिव्ह अबेकस सेंटर ने पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन (वेस्ट झोन) 2022 या स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून १४ पैकी १२ विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले आहेत.

६ मिनिटांत १०० गणित सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत सानवी संदिप मते, आराध्य वैभव दुराफे हे दोघेही लिटिल चॅम्पियन मध्ये महाराष्ट्रात अनुक्रमे ३ रा व ४ था क्रमांक पटकाविण्यात यशस्वी ठरले. तसेच वेदिका संतोष चासकर, सौमिश्री विकास वैष्णव या दोघी प्रथम लेवल मधील तिसरी या वर्गातून महाराष्ट्रातून अनुक्रमे ३ रा व ४ था क्रमांक मिळवून यशस्वी ठरल्या आहेत. शुभम महेंद्र देशपांडे याने प्रथम लेव्हलमधील ५ वी या वर्गातून महाराष्ट्रातून ४ था क्रमांक मिळविला.

सर्वज्ञ ज्ञानदेव बनसोडे या विद्यार्थ्यांने द्वितीय लेव्हल मध्ये महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळविला, त्याचप्रमाणे आराध्या अमोल बिडवई, आदिती महेंद्र देशपांडे, कृष्णा भरतकुमार चिलप, रियांश राहुल पवार, शौर्य अमित घोलप, जीविका जितेंद्र पुंडे हे विद्यार्थी बेस्ट परफॉर्मन्स साठी विनर ठरले आहेत.

सदर स्पर्धेत, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, मुंबई, ठाणे, पालघर तसेच गुजरातमधील ७८५ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

सदर कार्यक्रमास राजेंद्र लोचानी, स्नेहा लोचानी, अजय मणियार, सारिका करडे, तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना अश्विनी बारवे – दातखिळे व राहुल दातखिळे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय