Friday, May 17, 2024
Homeजिल्हाविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे स्मारक आणि नावाने...

विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे स्मारक आणि नावाने कमान उभारण्याची मागणी

नाशिक : स्वातंत्र्य सैनिक, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे स्मारक आणि नावाने कमान उभारण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनमाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हे भारत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ह्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिक चा गौरव करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नावाने राहत असलेल्या ठिकाणी पाट्या लावणे, रस्त्याला, चौकाला नाव देणे, कमान उभारणे आदी उपक्रम सांगितले आहे.

त्यानुसार जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, विधान परिषद चे पहिले विरोधी पक्षनेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या नावाने कमान व पुतळा उभारण्यात यावा. तसेच मनमाड शहरात स्वातंत्र्य सैनिक राहत असलेल्या मार्गाला व चौक ला नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीवर सकारात्मक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव राजू देसले, नाशिक जिल्हा सहसचिव साधना गायकवाड, सुभाष बेडमुथा, दामू पाटील, शबु शिरसाट, संपत जाधव, विजय दराडे, सुखदेव केदारे आदींची नावे आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय