Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमुलांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी "छत्री रंगवा" कार्यशाळा संपन्न

मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी “छत्री रंगवा” कार्यशाळा संपन्न

पिंपरी चिंचवड, 18 जुलै : पिंपरी चिंचवड परिसरातील लहान मोठयांसाठी दरवर्षी चिंचवडगाव येथे ‘क’ कॅलिग्राफी “सुंदर अक्षरांची शाळा” Umbrella painting workshop (छत्री रंगवा कार्यशाळा) मधुकर बच्चे युवा मंच वतीने आयोजित केली जाते. कोव्हीड मुळे गेली दोन वर्षे हा उपक्रम घेता आला नव्हता. या वर्षीही कै.मुरलीधर माचुत्रे व्यायामशाळा चिंचवड येथे अंब्रेला पेंटिंग (छत्री रंगवा) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यास परिसरातील लहान मोठयांनी चांगला प्रतिसाद दिला.

‘क’ कॅलोग्राफी संस्थेचे मुख्य शरद कुंजीर व अर्चना कुंजीर यांनी कार्यशाळेचे परीक्षण केले. अक्षय रसाळ, कांचन निकुंभ, सचिन खाडे, राहुल फाफळे, अभिनंदन इंगळे, अविनाश निमसे आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

परिसरातून पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. नागरिक आणि मुलांमध्ये अभिनव संकल्पनेद्वारे रंगकामातून कल्पना चित्रे मुलांनी छत्रीवर रंगवली. निसर्ग, पाऊस, पूर,परिसर स्वछता ई विविध कल्पना चित्रे यावेळी मुलांनी रंगवली. आजच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन संकल्पना पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात असतात, त्यांना व्यासपीठ देण्याचे काम आम्ही करत आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक शरद कुंजीर यांनी केले, तर अर्चना कुंजीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय