Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रागतिक पक्षांचा राज्यव्यापी एल्गार; जनजागरण सभा, जेल भरो व मंत्रालयावर मोर्चा

प्रागतिक पक्षांचा राज्यव्यापी एल्गार; जनजागरण सभा, जेल भरो व मंत्रालयावर मोर्चा

मुंबई : “शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त हमीभाव, पीक नुकसानीची योग्य नुकसान भरपाई, शेतमजूर व कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा, राज्यातील महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, व ओबीसी वर होणारे अन्याय व अत्याचार, महागाई व बेरोजगारीचे जटिल प्रश्न, संविधानिक मूल्यांचे रक्षण व त्यासाठी मनुवादी फॅसिझमच्या षडयंत्रास कसून विरोध, या संदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी राज्य पातळीवर सर्वप्रथम महाराष्ट्र जनजागरण सभा, त्यानंतर तालुका व जिल्हानिहाय जेल भरो आंदोलन आणि त्यानंतर मंत्रालयावर विराट मोर्चा असा आंदोलनात्मक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील संबंधित सर्व घटकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन प्रागतिक पक्षांच्या वतीने कॉ. डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार राजू शेट्टी, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, भाई आ. जयंत पाटील, आ. अबू असीम आझमी, आमदार हितेंद्र ठाकूर व आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांच्या वतीने करण्यात आले आहे. निश्चित व जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.


महाराष्ट्र जनजागरण सभा


1. कोल्हापूर – शुक्रवार 1 सप्टेंबर
2. सांगोला व सोलापूर – शनिवार 2 सप्टेंबर
3. पुणे – रविवार 3 सप्टेंबर
4. नंदुरबार – शुक्रवार 8 सप्टेंबर
5. नाशिक – शनिवार 9 सप्टेंबर
6. संभाजीनगर – रविवार 10 सप्टेंबर,
7. नांदेड – सोमवार 11 सप्टेंबर
8. अमरावती – शुक्रवार 15 सप्टेंबर
9. गडचिरोली व चंद्रपूर – शनिवार 16 सप्टेंबर
10. नागपूर – रविवार 17 सप्टेंबर
11. पालघर – मंगळवार 3 ऑक्टोबर
12. पनवेल/रायगड – बुधवार 4 ऑक्टोबर
11. मुंबई – रविवार 8 ऑक्टोबर

जेल भरो आंदोलन

राज्यात सर्वत्र स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवर
सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

मंत्रालयावर मोर्चा

मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले स्मृतिदिनी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई येथे प्रागतिक पक्षांच्या आघाडीमधील १३ घटक पक्षांची बैठक शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात झाली. कॉ. डॉ. अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. सुभाष लांडे, प्रा.एस. व्ही.जाधव, प्रताप होगाडे, संदीप जगताप, राहुल गायकवाड, एड. डी राजबर, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. अजित पाटील, महेंद्र पंडागळे, किशोर ढमाले, अनिस अहमद, कॉ. डॉ. एस. के. रेगे, कॉ. मधुकर कदम, दिपक चौगुले, एड. राजेंद्र कोरडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, मिलिंद गायकवाड, कॉ. शाम गोहिल, प्रभाकर नारकर इ. पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, रिपाई (सेक्युलर) व श्रमिक मुक्ती दल हे १३ घटक पक्ष सहभागी आहेत.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय