Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: सोयाबीन व गव्हाची चोरी करणारी टोळी जेरबंद; तब्ब्ल ८ लाखाचा मुद्देमाल...

Junnar: सोयाबीन व गव्हाची चोरी करणारी टोळी जेरबंद; तब्ब्ल ८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Junnar: जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीन व गव्हाची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून तब्बल ५ हजार ६५० किलो वजनाचे ११३ सोयाबीन कट्टे व ८ गव्हाच्या कट्ट्यासह ८ लाख ७९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे. (Junnar)

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीन, गहू तसेच शेती उपयोगी साहित्याची चोरीच्या तक्रारीसंदर्भात जुन्नर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच प्रमाणे गणेश केदार (रा. घोडेगाव फाटा ता. जुन्नर ) यांनी देखील अज्ञात चोरट्यानी त्यांच्या वडगाव साहनी येथील फार्म हाऊस मधून सोयाबीनचे ३५ कट्टे चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. (Junnar)

सदर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत सुरु होता. यासंदर्भात विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या चोऱ्या एकच टोळी करत असल्याचे गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले. सिसिटीव्ही फुटेज च्या आधारे गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा मागोवा घेतला असता सदर पिकअप निमदरी ता. जुन्नर या भागातील असल्याचे समजले.

यासंदर्भात गोपनीय बातमीदारमार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ, साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे माहिती मिळाली. तसेच सदर इसम हे त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडीने सोयाबीन विक्री करणेसाठी घोडेगाव फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअप सह संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरी केल्याबाबतची कबुली दिली आहे.

त्यांच्या ताब्यातून एकूण ५ हजार ६५० किलो सोयाबीन चे एकूण ११३ कट्टे तसेच ४८० किलो वजनाचे गव्हाचे ८ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण ८ लाख ७९ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Junnar)

निलेश लक्षण केवळ, साईनाथ विलास केवळ, रवींद्र गोरक्ष केवळ, राजेंद्र रामदास केवळ सर्वजण रा. निमदरी ता. जुन्नर तसेच सुनील मोहन काळे आणि रविराज विजय मोधे (दोघे रा. कुसुर,तलाखी ता. जुन्नर ) अशी त्यांची नावे असून वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकरिता त्यांना जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, पोलिस नाईक संदिप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, आकाश खंडे यांनी केली आहे.

या आरोपीच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई बद्दल शेतकरी वर्गातून कौतुक केले जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय