Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: जिल्हा परिषद शाळेस संगणक संच भेट; समाजासमोर ठेवला आदर्श

Junnar: जिल्हा परिषद शाळेस संगणक संच भेट; समाजासमोर ठेवला आदर्श

Junnar/ आनंद कांबळे : तालुक्यातील वडगाव सहाणी ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे व युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रसाद महाराज वाबळे यांस कडून वडगाव सहाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस एक संगणक संच भेट देण्यात आला. (Junnar)

ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांनी आपल्या कीर्तनातून संगणक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. जिल्हा परिषद शाळेत सर्वांना मोफत शिक्षण दिले जाते. गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यावा यासाठी सर्व पालकांना आवाहन केले. याप्रसंगी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. (Junnar)

यामध्ये प्रभारी सरपंच अविनाश वाबळे, माजी सरपंच वैशालीताई तांबोळी, माजी उपसरपंच विठ्ठल जानबा तांबोळी, मा.ग्रामपंचायत सदस्य अतुल वाबळे, सोसायटीचे चेअरमन हंबीर वाबळे, रमेश महाराज वाबळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शैलेश वाबळे, वडगाव सहाणी युवा फाउंडेशनचे सुनील शिंदे, मदन वाबळे, मंगेश वाबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल तांबोळी, उपाध्यक्ष कल्याणी वाबळे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे व उपशिक्षक बाळासाहेब बांबळे, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार राजेंद्र बेलवटे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय