Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: जुन्नर मध्ये महावीर जयंती साजरी!

Junnar: जुन्नर मध्ये महावीर जयंती साजरी!

Junnar: शहरामध्ये महावीर जयंती विविध कार्यक्रम व उत्साहात साजरी करण्यात आली. जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेची साध्वी तीर्थरत्नाश्रीजी व साध्वी हिंकाररत्नाश्रीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले. (Junnar)

श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.

सध्याच्या भयावह हिंसेच्या जगात “जाणते वा अजाणतेपणी कुणालाही न दुखवण्याच्या” त्यांच्या संदेशाचे स्मरण करत सत्य-ज्ञान-अहिंसेचा जयजयकार तसेच भगवान महावीरांचा जयघोष करीत निघालेल्या या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर मिरवणुकीत दांडिया खेळण्याचा आनंद घेत जैन बांधव व महिलांनी रथ ओढला. यावेळी “जिओ और जिने दो” च्या घोषणा देण्यात आल्या. सदर मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर फुलचंद रतनचंद मुथ्था परिवारा तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राजाराम पाटील वृद्धाश्रम, बल्लाळवाडी येथे मिष्टान्न जेवण देण्यात आले. तसेच सायंकाळी युवकांच्या वतीने अहिंसा रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रमेश शहा, सुभाष बोकरिया, हितेंद्र गांधी, नितीन गांधी, संजय शहा, मुकेश शहा, राजेश शहा, समीर शहा, निलेश शहा, संदीप शहा, नितीन शहा, धनेश शिंगवी, रणजित शहा,मिलिंद गांधी, सूरज नानावटी, हर्षद गांधी, केतन नानावटी, कल्पेश नानावटी, ऍड समकीत नानावटी तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय