Friday, November 22, 2024
Homeजिल्हाRajgurunagar : किसान सभेकडून आदिवासी बांधवांना हिरडा पिक झाडाच्या रोपांचे वाटप

Rajgurunagar : किसान सभेकडून आदिवासी बांधवांना हिरडा पिक झाडाच्या रोपांचे वाटप

Rajgurunagar : अखिल भारतीय किसान सभेने नायफड ग्रामस्थांना 500 हिरडा झाडाच्या रोपांचे वाटप करून आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. आदिवासी भागामध्ये हिरडा पीक हे किंवा हिरडा झाड हे आदिवासी लोकांच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचे भूमिका बजावते.

ग्रामीण आदिवासी भागांमध्ये भात पीक सोडल्यानंतर आर्थिक उत्पन्नासाठी दुसरं कोणतंही माध्यम नसल्याने एकमेव हिरडा झाडावरती आदिवासी बांधवांना अवलंबून राहावं लागतं म्हणूनच आदिवासी भागातील लोकांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच त्यांचा आर्थिक विकासही झाला पाहिजे हा महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय किसान सभेने 500 झाडे खरेदी करून सोमवार, दि. 26 ऑगस्ट रोजी ती नायफड ग्रामस्थांना वाटप केली. (Rajgurunagar)

तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय हे संयुक्तरित्या प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या सातबारा वरती हिरडा झाडाच्या नोंद करून घेतील. त्यामुळे भविष्यामध्ये अति पर्जन्यवृष्टी वादळ यामधून जर हिरडा झाडाचे नुकसान झाले तर त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळेल असं किसान सभेने आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या वेळी नायफड गावचे ग्रामसेवक गारे तसेच सरपंच करिष्मा ताई बांबळे, उपसरपंच दत्ता माळी त्याचप्रमाणे अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा सदस्य महेंद्र थोरात साहेब, खेड तालुक्याचे अध्यक्ष किसनराव ठाकूर, खेड तालुका सहसचिव विकास भाईक, अखिल किसान सभा नायफड शाखेचे अध्यक्ष मारुती शिंदे, सखाराम जोशी, डेहणे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाना काशाळे, नायफड सोशल फाउंडेशनचे सचिव सुदर्शन तिटकारे, किशोर कावळे, पंढरीनाथ तिटकारे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा

बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती

ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी

मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी

संबंधित लेख

लोकप्रिय