राजकोट : राजकोट किल्ल्यावर उभारलेला उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, केवळ आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवरायांच्या शौर्याला सलाम करण्याच्या उद्देशाने नौदल दिनानिमित्त मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचा कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, शिवप्रेमींकडून पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामावर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे 43 फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर 28 फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. (Chhatrapati Shivaji Maharaj)
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधताना, “निकृष्ट कामामुळेच हा पुतळा कोसळला आहे, हे शिवप्रेमींना मान्य नाही. आम्ही याचा निषेध करतो,” असे वक्तव्य केले आहे.
नाईक यांनी पुढे सांगितले की, “पुतळ्याच्या बांधकामाच्या वेळेस स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या होत्या, पण त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. 400 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्याचा एकही दगड ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काही भाग मात्र ढासळला होता. या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू.”
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत, “शिवरायांचा पुतळा कोसळणे अत्यंत दुर्देवी आहे. तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील. परंतु, शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर पुन्हा उभा करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे,” असे म्हटले आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी
मोठी बातमी : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक
मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी
ब्रेकिंग : पुणे सह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट
लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती