Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याKangana Ranaut : कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

Kangana Ranaut : कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतने (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलना बाबत वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचे गंभीर आरोप कंगना राणावतने केला आहे. कंगनाच्या या विधानानंतर आता नवा वाद उफाळला आहे.

Kangana Ranaut काय म्हणाली ?

कंगनाने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मागील वर्षीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, त्यावेळी अनेक बलात्कार आणि हत्यांची घटना घडली होती. तिने असेही म्हटले होते की, जर केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयके मागे घेतली नसती, तर आणखी भयावह घटना घडल्या असत्या. कंगनाच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे. आता भारतीय जनता पक्षाने देखील तिच्या विधानाशी असहमती व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत दिलेले विधान पक्षाचे मत नाही. “कंगना राणावत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाचा कोणताही समर्थन नाही. पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधान करण्याची कंगनाला अधिकृतता नाही,” असे भाजपने स्पष्ट केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी

मोठी बातमी : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी

ब्रेकिंग : पुणे सह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय