Tuesday, November 5, 2024
Homeताज्या बातम्याScholarship : बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती

Scholarship : बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती

मुंबई : बार्टीच्या (Barti) ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती (scholarship) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे विद्यार्थी समुदायात आनंदाची लहर पसरली आहे.

यापूर्वी, अधिछात्रवृत्ती योजनेतील २०२२ च्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आणि सारथी व महाज्योती योजनेप्रमाणेच बार्टीच्या विद्यार्थ्यांनाही समान लाभ मिळावा, यासाठी १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला गेला. पात्र विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळून आणि शपथपत्र घेऊन त्यांना ही अधिछात्रवृत्ती (scholarship) देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सुमारे ३७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी

ब्रेकिंग : पुणे सह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय