Sunday, April 28, 2024
Homeराज्यरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने राजीनामा द्यावा – डॉ. अभिजित वैद्य

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने राजीनामा द्यावा – डॉ. अभिजित वैद्य

पुणे : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेतील मृतांना आरोग्य सेनेतर्फे श्रद्धांजली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ.अभिजित वैद्य यांनी केली आहे.

ओडिशा राज्यातील बालासोर येथे चुकीच्या सिग्नल यंत्रणेमुळे तीन रेल्वेंच्या झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत २८८ मृत्यू आणि ९०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेला हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात आहे. लाल बहाद्दर शास्त्री आणि नितीशकुमार यांनी घालून दिलेल्या उच्च नैतिक परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवून मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी करण्यात आली आहे.

परंतु राजीनामा देणे तर सोडाच उलट रेल्वे गाड्यांना अपघात प्रतिबंधक कवच कसे दिलेले आहे असा बालिश युक्तिवाद ते माध्यमांपुढे करीत आहेत. अर्थात गटारातील गॅस वर चहा करणे, बालकोट हल्ल्यात ढगांमध्ये विमाने लपवून रडारला फसवणे, गणपती ही जगातील पहिली प्लॅस्टिक सर्जरी होती असे बालिश विज्ञान मांडणाऱ्या अल्पशिक्षित आणि विज्ञाननिरक्षर मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून यापेक्षा अधिक अपेक्षा करता येणार नाही. भाजपा चे लोक त्यांच्या कितीही चुका होवोत, त्यांच्यावर कितीही गंभीर आरोप असोत सत्ता सोडत नसतात. त्यांचा पक्ष त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसतो. उलट त्या व्यक्तीची हिंदुत्व आणि विशेषत: ब्राह्मण्यावर जेवढी निष्ठा आणि त्यासाठी त्याची जेवढी उपयुक्तता त्या व्यक्तीला तेवढे अभय दिले जाते. कुलदीप सेंगर, बजरंगी, माया कोडनानी, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा लखीमपूर खेरा येथे शेतकरी चिरडणारा दिवटा मुलगा अजय , देशाला लुबाडणारा अदानीआणि आता ब्रिजभूषण सिंग अशी अनेक उदाहरणे आहेत. संविधान, कायदा, नैतिकता आणि साधी मानवता यांच्याशी दुरान्वयेही नाते नसणारे हे लोक आहेत. निवडणूक आणि सत्ता यांसाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात ते त्यांनी पुलवामा येथे दाखवून दिले आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या हौतात्माचे, जे शंभर टक्के टाळता आले असते, निवडणूक जिंकण्यासाठी देशाचे पंतप्रधान मार्केटिंग करू शकतात तिथे सामान्य माणसाची काय कथा ? असा सवालही केला आहे.

अश्विनी वैष्णव आपण वैज्ञानिक चमत्कार घडवून रेल्वे गाड्यांना अपघात घडणार नाही असे खास महाभारतील ग्रंथ वाचून किंवा वेदांमधील विज्ञान वापरून जे कवच दिले होते तो मग दोन हजार च्या नोटे मधील चिप सारखा काही जुमला होता का ? हे कवच देण्यासाठी जनतेचे किती कोटी खर्च करण्यात आले होते ? याचे कंत्राट कोणत्या कंपनीला दिले होते ? हे नक्की काय तंत्रज्ञान होते ? हे आपण जाहीर कराल का ? जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपण हे सर्व जाहीर करावे. तसेच तातडीने राजीनामा द्यावात आणि भाजपायी लोकांचा संवेदना आणि सदसदविवेकबुद्धी यांच्याशी सुतराम संबंध नसतो हा समज चुकीचा ठरवावात, असेही ते म्हणाले.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

थांबवा फसवणुकीचा प्रकार; असे करा अपडेट ‘आधार’

देशातील पहिलं “आधार कार्ड” कोणाचे बनले माहिती आहे का? नसेल तर वाचा !

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; नवी मुंबई व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय