Friday, May 3, 2024
Homeराजकारणठाकरे गटाला पुन्हा धक्का; नवी मुंबई व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; नवी मुंबई व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

भिवंडी : ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. भिवंडी येथील ठाकरे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर नवी मुंबई व नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथील पाटीदार सभागृहात आज शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा प्रवेश संपन्न झाला.

या प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार विश्वनाथ भोईर, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, अंबरनाथ माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काहीच दिवसांपूर्वी मुंबईमधील चांदिवली येथील प्रभाग क्र.१६० चे नगरसेवक किरण लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय