Friday, November 22, 2024
Homeजिल्हाभीषण अपघात : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू ; धुक्यामुळे अपघात झाल्याची...

भीषण अपघात : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू ; धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता

Pune: आज सकाळी पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात एक दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघात घडला असून, यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून सकाळी 7.30 वाजता उड्डाण घेतलेल्या हेरिटेज एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला. मुळशीतील डोंगराळ भागात धुक्यामुळे वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मंगळवारी खासदार सुनील तटकरे यांनी याच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते.

हिंजवडी पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, आणि बचाव पथके तातडीने पोहोचली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू परिसरातील ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रिसॉर्टला जात होते.

सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय