MLA Atul benke : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आली आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित एका बैठकीत जुन्नर येथील अल्पसंख्याक समाजातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या नेत्यांनी सध्या अजित पवार यांच्या गटात असलेल्या आमदार अतुल बेनके यांना पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटात घेऊन त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या भेटीसाठी आलेल्या जुन्नरमधील अल्पसंख्याक समाजातील नेत्यांनी आमदार बेनकेंना पक्षात परत घेण्याची विनंती केली. या नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण, वाजीद इनामदार, गुलाम अस्करी आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याकडे आमदार अतुल बेनके यांना पुन्हा आपल्या गटात सामील करून त्यांना जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी. आम्ही आपल्या पक्षाच्या खासदारांना निवडून आणलं आहे, आता आपल्या पक्षाचा आमदारही निवडून यावा, आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी आपल्या पक्षातून द्यावी, अशी आम्ही विनंती केली.
शरद पवारांनी या विनंतीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, “मी यावर नक्की विचार करेन,” असे आश्वासन दिले आहे.
MLA Atul benke
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर