Saturday, October 5, 2024
Homeआरोग्यमोठी बातमी : अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मोठी बातमी : अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

Govinda: बॉलीवूड अभिनेता गोविंदा याच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून ती थेट गोविंदाच्या पायाला लागल्याचे समजते.मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चाहते देखील या बातमीमुळे चिंतेत पडले आहेत.

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांच्या माहितीनुसार, अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होता. गोविंदा घरातून बाहेर पडताना आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वर हाताळत असताना ते हातातून पडले, आणि या दरम्यान रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली. गोळी गोविंदाच्या पायाला लागली,.रिव्हॉल्व्हरचे कुलूप उघडे असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्वरित उपचार घेतल्यामुळे सर्जरी करून गोळी काढण्यात आली आहे, आणि सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. ते सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती ANI ला देण्यात आली आहे.

घटनेनंतर गोविंदाने आपल्या चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. गोविंदा म्हणाला, “तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने आणि पालक-गुरुंच्या कृपेने आता मी ठीक आहे. डॉक्टरांनी अतिशय चांगले उपचार केले, आणि तुमच्या प्रार्थना महत्त्वाच्या ठरल्या.”

Govinda

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय