इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजन; ८०० पेक्षा अधिक दंतवैद्यकांचा सहभाग (Pune)
प्रा. डॉ. दीनानाथ खोळकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) होणार उद्घाटन; डॉ. रत्नदीप जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे २२ ते २४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ‘प्रगत दंतोपचार व दंतरोपण’ यावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. इटली येथील कम्प्युटर एडेड इम्प्लांटॉलॉजी अकॅडमी (सीएआय, इटली) आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड इम्प्लांटॉलॉजी (आयएयुएसआय, ऑस्ट्रिया) या दोन संस्थांनी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीला शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिला आहे. (Pune)
शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. दीनानाथ खोळकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जर्मनी येथील ओरल सर्जन डॉ. फ्रॅंक झास्ट्रो व इजिप्त येथील इम्प्लांटालॉजिस्ट डॉ. सॅम ओमर आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसंगी सचिव डॉ. विजय ताम्हाणे, खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, संचालक डॉ. माधवी मापूस्कर व डॉ. विजय मब्रूकर उपस्थित होते.
डॉ. रत्नदीप जाधव म्हणाले, “जगभरातील दंतवैद्यकांना एकत्रित आणून नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणणे, या उद्देशाने ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार व दंतरोपण उपचारांवर चर्चा होणार आहे. देशभरातून ८०० हुन अधिक दंतवैद्यक सहभागी होणार आहेत. भारतासह अमेरिका, इंग्लंड, इटली, इजिप्त, ग्रीस, टर्की, ऑस्ट्रिया, पोलंड या देशातूनही काही दंतवैद्यक सहभागी होतील. तीनही दिवस चर्चासत्रांसह प्रात्यक्षिक कार्यशाळा होणार आहेत. तसेच अत्याधुनिक उपकरणांचे प्रदर्शन येथे असणार आहे.” (Pune)
डॉ. विजय ताम्हाणे म्हणाले, “परिषदेत माईक बारसेव (जर्मनी), डॉ. विपीन माहूरकर (भारत), डॉ. नीरज रोहिडा, डॉ. निखिल देशपांडे, डॉ. नील आशर, डॉ. सतीश पालायन (अमेरिका), डॉ. पंकज चिवटे, डॉ. निखिल जाधव, डॉ. फ्रॅंक झास्ट्रो (जर्मनी), डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. सॅम ओमर (इजिप्त), डॉ. लॉरेन्स सेर्स (फ्रान्स), डॉ. दाईही ली (न्यूझीलंड), डॉ. नीरज किनारीवाला, डॉ. लुईगी रूबिनो (युरोप), आंद्रेई अँड्रीव्ह (रशिया), डॉ. माजिद ओमर इसा अबु आर्कुब (जॉर्डन), सुदीप पॉल यांची विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. ‘डिजिटल डेंटिस्ट्री : क्लिनिकल पर्स्पेक्टिव्ह’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.”
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्री :
‘आयएसडीडी’ हे ज्ञान, प्रशिक्षण व संशोधनाने प्रगत दंतोपचाराला लोकाभिमुख करणारे व्यासपीठ आहे. या संस्थेची फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थापना झाली. अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक आदींचा उपयोग करून उपचार करणे शक्य झाले आहे. या प्रगत दंतोपचाराला अधिक लोकाभिमुख करण्याच्या, तसेच तंत्रज्ञानाधारित उपचार करणाऱ्या तज्ज्ञ दंतवैद्यकांना एकत्रितपणे काम करता यावे, तसेच या क्षेत्रात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांना नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणणे, ही प्रामुख्याने संस्थेची उद्दिष्टे आहेत. देशभरातील दंतवैद्यक याचे सदस्यत्व स्वीकारत आहेत.
हेही वाचा :
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य