Saturday, April 27, 2024
Homeजिल्हाPatas पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा. लि. तर्फे विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या शौचालय व...

Patas पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा. लि. तर्फे विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या शौचालय व इतर सुविधांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

पाटस : पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा. लि. ने सामाजिक बांधिलकी जपत दौंड तालुक्यातील पाटस, अंबिका नगर, चौफुला परिसरातील धायगुडेवाडी क्रमांक 1, धायगुडेवाडी क्रमांक 2, यवत तसेच भिगवन येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुख सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने मुलांसाठी व मुलींसाठी शौचालये, मुतारी, हॅन्ड वॉश स्टेशन, कम्प्युटर लॅब, बेंचेस इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या सर्व ठिकाणी उभारलेल्या कामांचे उद्घाटन दिनांक 26 मार्च 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. Patas


कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश सिरय्या, शशी भाटिया, हरी सुब्रमण्यम ,हिना शहा मॅडम, गणेश नीलम तसेच पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चे प्रोजेक्ट हेड फनी कुमार मुला, मेंटेनन्स मॅनेजर सुरजितसिंग, चीफ फायनान्स ऑफिसर हरीश अग्रवाल सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.Patas



उद्घाटन सोहळ्या वेळी जिल्हा परिषदेच्या पाटस, अंबिका नगर, धायगुडेवाडी क्रमांक 1, धायगुडेवाडी क्रमांक 2, भिगवन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी या कामांबद्दल पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चे आभार व्यक्त केले तसेच कॉन्ट्रॅक्टर भंडलकर इंजीनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रा लि चे संतोष दादा बंडलकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.Patas



पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा लि चे मेंटेनन्स मॅनेजर सुरजित सिंग यांनी कामाच्या ठिकाणी बांधकामावेळी वेळोवेळी भेटी देऊन कामे वेळेत व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले .पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा लि चे लीगल ऑफिसर एडवोकेट योगेश सरोदे यांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या पूर्वी विविध गावां मधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांना आवश्यक गरजांची माहिती घेतली. Patas



कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाची व कौतुकाची भावना पहावयास मिळाली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी फुलांचा सडा टाकून लेझीम तसेच ढोल ताशाच्या गजरामध्ये व फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परदेशी प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीचे ही प्रशिक्षण देण्यात आले.कामांच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वृक्षारोपण ही करण्यात आले.Patas

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय