Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जीतोच्या वतीने रविवारी अहिंसा रनचे आयोजन

PCMC : जीतोच्या वतीने रविवारी अहिंसा रनचे आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन(जीतो) पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने दि ३१ मार्च २४ रोजी शहरात सर्वधर्मीय “अहिंसा” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड (PCMC) चॅप्टरचे अध्यक्ष मनिष ओसवाल यांनी दिली आहे.

दि ३१ मार्च रोजी सकाळी ५:३० वा चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदान येथून या मॅरेथॉन ला प्रारंभ होईल.बिजलीनगर- भेळ चौक- लाल बहादुरशास्त्री चौक- निगडीतील कृष्णा हॉटेल पर्यंत पुन्हा याच मार्गाने चिंचवड च्या जैन शाळा मैदान या मार्गाने हि मॅरेथॉन होईल.१० किमी, ५किमी, ३ किमी या तीन गटात हि मॅरेथॉन होईल. PCMC यावेळी जीतोचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी देशातील ६८ तर विदेशातील जीतोच्या २७ चॅप्टरने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

या मॅरेथॉनमध्ये हजारो नागरीक धावणार आहे.सहभागी होणाऱ्या धावपटूना शर्ट, अल्पोपहार देण्यात येतील. PCMC NEWS

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष मनिष ओसवाल, मुख्य सचिव योगेश बाफना, जीतो महिला विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना, सचिव योगिता लुंकड,जीतो युवा अध्यक्ष सौरभ बेदमुथा, सचिव प्रणव खाबिया आदिंनी पुढाकार घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय