Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवडमधे 'वाचक मैफलीचा' उत्साहात शुभारंभ !

पिंपरी चिंचवडमधे ‘वाचक मैफलीचा’ उत्साहात शुभारंभ !

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्य विधेच्या वतीने २४ जुलैला भारतमाता भवन चिंचवड येथे ‘वाचक मैफल’ आयोजित करण्यात आली. पुण्यामध्ये गेली ५ वर्ष यशस्वीपणे सुरू असलेल्या या ‘वाचक मैफल” उपक्रमाची सुरुवात आज पिंपरी चिंचवड मधे प्रसिद्ध लेखक कवी,गझलकार अनिल आठलेकर यांच्या उपस्थितीत झाली. वाचक मैफलीच्या स्वरूपाबद्दल सांगताना आठलेकर म्हणाले की “वाचनाची आवड जोपासताना आपण काय वाचले याविषयी इतर रसिक वाचकांशी देवाणघेवाण व्हावी व आपल्या वाचनाच्या कक्षा रूंद व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. दर महिन्याच्या ठराविक दिवशी घेण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्व वयोगटातल्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला.आता याच प्रेरणेतून आज पिंपरी चिंचवडमधे या वाचक मैफल उपक्रमाचा शुभारंभ होतो आहे.”


त्यानंतर उपस्थित वाचकांनी आपला परिचय देत वाचनाच्या आवडी विषयी व आवडत्या पुस्तकांविषयी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. संस्कारभारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. साहित्यविधा प्रमुख प्रणिता बोबडे यांनी संस्कार भारतीविषयी व पिंपरी चिंचवड समितीच्या उपक्रमां विषयी उपस्थितांना माहिती सांगितली व सहविधासंयोजक शुभदा दामले यांनी वाचक मैफलच्या अनिल आठलेकर यांचा थोडक्यात परिचय करून दिला. पहिल्या वाचक मैफलीसाठी धनंजय तडवळकर,अन्वी आठलेकर यांच्यासह पुण्यातील वाचक मैफिलीशी जोडले गेलेले अनेक वाचक आवर्जून उपस्थित होते. पिंपरी चिंचवड साहित्यविधेतील लेखक पत्रकार प्रदीप गांधलीकर यांच्यासह अनेक सदस्य, प्रकाशक नितीन हिरवे व परिसरातील रसिक वाचकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.


वाचक मैफलीचे पहिले पुष्प लेखक सतीश काळसेकर यांना समर्पित केले होते. अन्वी आठलेकर यांनी त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये संस्कार भारतीच्या वतीने होणाऱ्या या वाचक मैफिल साठी स्व.तात्या बापट स्मृती समितीने विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल तात्या बापट स्मृती समिती आणि भारतमाता भवन व्यवस्थापनाचे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या वाचक मैफिलीसाठी संस्कार भारती पश्चिम प्रांत संयोजिका विशाखा कुलकर्णी, पिं.चिं.समिती संपर्क मंत्री सायली काणे, बालविभाग सह संयोजक प्रमुख स्मिता देशपांडे, रांगोळीविधा सहसंयोजक सुनीता कुलकर्णी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा दामले यांनी केले.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय