Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुण्यातील नवउद्योयोजकांनी ४५ पदार्थ बनवणाऱ्या स्मार्ट कुकरला मिळवले पेटंट

पुण्यातील नवउद्योयोजकांनी ४५ पदार्थ बनवणाऱ्या स्मार्ट कुकरला मिळवले पेटंट

स्मार्ट कुकरचे पुण्यात झाले उद्घाटन

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर :
पाच वर्षाच्या अथक परिश्रमातून विजय मोहिते ,प्रविण कांबळे व स्वाती कानडे या अस्सल मराठी नवउद्योजकांनी तब्बल ४५ पदार्थ बनवणाऱ्या एका ऐतिहासिक कुकरची निर्मिती केली असून पुणे शहराच्या लौकिकात भर पाडली असून उद्योग विश्वात एक नवा इतिहास निर्माण केला आहे .या सर्व समावेशक आणि आगळ्या वेगळ्या अनेकम कुकरचे उद्घाटन दलित इंडियन चेबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय समन्वयक सीमा मिलिंद कांबळे ,प्रसिद्ध सिनेअभिनेत्री स्निग्धा अकोलकर तसेच भारत सरकारच्या इइपीसी विभागाचे संचालक रजत श्रीवात्सव यांच्या हस्ते मराठा चेबर ऑफ कॉमर्स एंड अग्रिकल्चर सभागृहात पार पडले .



या कुकरमध्ये तब्बल ४५ पदार्थ तयार करता येतात .सध्या देशभरात अशा प्रकारचा हा एकमेव कुकर आहे आणि तो तयार करून या नवउद्योजकांनी एक फार मोठी झेप घेतली आहे .लकरच या कुकरला देशात नाही तर जगभर मागणी वाढणार असल्याचे मत डिक्की च्या राष्ट्रीय समन्वयक सीमा कांबळे यांनी व्यक्त केले . प्रसिद्ध सिनेअभिनेत्री स्निग्धा अकोलकर म्हणाल्या की आज या नवउयोजकांच्या कामाची प्रेरणा तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे कारण नुसत्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा व्यवसायात ही फार मोठी संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .



रजत श्रीवास्तव यांनी आपल्या पाठीशी भारत सरकर आहे जगभरात तुम्हाला पोहचण्यासाठी आम्ही आपल्याला सहकार्य करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी डिक्की चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर, डिक्की राष्ट्रीय समन्न्वयक सीमा मिलिंद कांबळे, अभिनेत्री स्निग्धा अकोलकर, रजत श्रीवास्तव, नवउद्योजक स्वाती कानडे, प्रविण कांबळे, विजय मोहिते, यासह पुणे शहरातिल अनेक मान्यवर उपस्थित होते .

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय