पिंपरी चिंचवड : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात सर्व उपनगरात बंद पाळण्यात आला. अनेक व्यापारांनी आणि उद्योजकांनी सहभाग घेत दुकाने बंद ठेवली. पिंपरी कॅम्प, भाटनगर येथून मोर्चा काढण्यात आला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकच मिशन मराठा आरक्षण, अशा घोषणा देत पिंपरीत आंदोलन करण्यात आले. Pimpri Chinchwad Bandh Successful : Maratha Reservation and All-Party Support for Maratha Kranti Morcha
या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेते सहभागी झालेत. सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस यासारख्या सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दिला.
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ सह वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा छावा युवा संघटना, काँग्रेस पक्ष, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वराज्य संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, मराठा महासंघ, श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, अखिल भारतीय छावा, शिवयोध्दा प्रतिष्ठाण,अखिल भारतीय मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य अभियान,राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरी संघ, अपणा वतन संघटना, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, छावा युवा मराठा महासंघ, आम आदमी पार्टी, एमआयएम, भिमशाही युवा संघटना, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती,फुले शाहू आंबेडकर विचार मंच, मराठा जोडो अभियान, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय इसाई महासंघ, दलित पँथर सेना, बौद्ध जनसंघ, शिवशाही संघटना, शिवप्रेमी जनजागरण समिती, मराठा महासभा यासह अनेक सामाज संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना व मंडळे यांनी पाठींबा दर्शवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मोर्चाचे कार्यकर्ते मारुती भापकर, माजी नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, सीमा सावळे, तुषार कामठे, विनायक रणसुभे, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, काशिनाथ नखाते, सुनील गव्हाणे, इम्रान शेख आदी सहभागी झाले होते.