Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याAmol Kolhe: पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून वैयक्तिक टीका – डॉ.अमोल कोल्हे

Amol Kolhe: पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून वैयक्तिक टीका – डॉ.अमोल कोल्हे

Amol Kolhe : धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात असल्याची टीका महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं.

महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघडी लोकसभा निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मोहन जोशी, बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, तसेच विश्वजित कदम, संग्राम थोपटे, संजय जगताप, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, सचिन आहेर, आपचे नेते अजित पाटील, भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुढे म्हणाले, प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले की, स्वाभिमानाने तुतारी फुक्याची आणि मशाल पेटवायची. पण मला धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात आहे.

मला नटसम्राट म्हणले जाते, कार्य सम्राट परवडतो पण खोके सम्राट, पलटी सम्राट चालत नाही. कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतो या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकशाहीची थट्टा करता का सवाल करत, तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे. स्वतःची मालकी असल्या सारखे वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेत जावा. सत्तेची मस्ती, गुर्मी कोठून येते असा थेट सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केलाय.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय