Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याSupriya Sule : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Supriya Sule: बारामती लोकसभा निवडणुकीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांची कन्या प्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी लढत होणार आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज (दि.१८) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे.

मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिस-या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुस-या टप्प्यात असल्याने तेथे १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय