पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरात वास्तव्य करणा-या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या हजारो कोकणी बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला. PCMC
पिंपरी विधानसभा (pimpri ) कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्षेत्रात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने वधू- वर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात शहरातील हजारो मतदारांनी मतदानाची शपथ घेतली.यावेळी नोडल अधिकारी मुकेश कोळप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, प्रमोद राणे, अँड. चंद्रकांत गायकवाड, अरूण दळवी, परषुराम प्रभू, दिपज्योती सावंत उपस्थित होत्या. pcmc news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ६ हजाराहून अधिक कुटुंबे शहरात वास्तव्य करतात, मतदारांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे यामध्ये नवोदीत मतदारांचाही समावेश आहे.
यावेळी सर्वांनी १३ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवोदीत मतदार मनाली पाताडे यांनी मी स्वत: मतदान करणार असुन तुम्हीही मतदान करा असे इतर मतदारांनाही आवाहन केले तसेच भावी वधुवरांंनी देखील लग्नाची तारीख कोणतीही असो, आम्ही सर्वप्रथम मतदान करणार असल्याचे सांगुन इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. pcmc news
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी