Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : रिक्षा चालकांची नेत्र तपासणी स्तुत्य उपक्रम - अतुल आदे (RTO)

PCMC : रिक्षा चालकांची नेत्र तपासणी स्तुत्य उपक्रम – अतुल आदे (RTO)

रिक्षा पंचायतीचा तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रिक्षाचालकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्यास अपघात किंवा दुर्घटना होणार नाहीत, रस्ता सुरक्षा राखली जाईल, रिक्षा पंचायतीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विविध ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी व्यक्त केले. pcmc news

रोटरी क्लब संभाजीनगर आणि काळेवाडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार,एच व्ही देसाई रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नरवाडकर,कामगार नेते काशिनाथ नखाते,रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष गिरमे, परिवहन अधिकारी मनोज ओतारी,निरीक्षक बालाजी धनवे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, काशिनाथ शेलार, अशोक मिरगे, आत्माराम नाणेकर आदी उपस्थित होते. pcmc news

नितीन पवार यांनी म्हणाले की पिंपरी चिंचवड (pcmc) पुणे शहरात सुमारे १० ठिकाणी हा रिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणीचा (Eye check up) आणि चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे प्रचंड प्रतिसाद आहे तीस वर्षाचा टप्पा गाठत असताना पंचायतीच्या माध्यमातून रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. pcmc news

मानव कांबळे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत रिक्षा चालक आपल्या वर्धापन दिनानिमित्त इतर कोणतेही इतर कार्यक्रम न करता समाज उपयोगी परीक्षा चालकांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल अभिनंदन केले.

रिक्षा चालकांना शासनाने नेहमीच झुलवत ठेवलेले असून त्यांच्यासाठी महामंडळ त्वरित सुरू करून त्यांना न्याय देण्याची गरज असल्याचे मत नखाते यांनी व्यक्त केले.

अशोक मिर्गे यानी रिक्षा चालकांच्या व्यथा मांडल्या कोरोनानंतर अनेकांचे हप्ते थकलेले आहेत, रिक्षाचालक हप्ते थोडे थोडे करून भरत असताना हे गाडी ओढून नेण्याचा आणि त्याच्यावर दंडावर दंड व्याजावर व्याज लावण्याचा जो प्रकार आहे तो कमी झाला पाहिजे त्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची गरज आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, नजीर सय्यद, हिरा लांडगे, गणेश लोखंडे, संतोष खराडे, दादासाहेब धावारे,अनिल जगताप, संदीप करमासे, सुनील ढेंगे, मोहन मुळीक, सुरेश चित्ते, यांनी प्रयत्न केले.

सूत्रसंचालन शैलजा चौधरी यांनी केली तर आभार उर्वशी गाढ़वे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय