Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सार्वजनिक सुरक्षेसाठी अनियंत्रित भंगार व्यवसाय तातडीने बंद करा - संजीवन...

PCMC : सार्वजनिक सुरक्षेसाठी अनियंत्रित भंगार व्यवसाय तातडीने बंद करा – संजीवन सांगळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिखली कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांचे (Scrap warehouses) स्वतंत्र सेफ्टी ऑडिट महानगरपालिकेने केले नसल्यामुळे येथील दुकानांना वारंवार आगी लागून परिसरात धोकादायक स्थिती आणि प्रदूषण निर्माण होते. (pcmc news)

चिखली, कुदळवाडी (pcmc) तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये प्लास्टिक, कागदी पुठ्ठा, लाकूड या ज्वलनशील वस्तूंची भंगार खरेदी विक्रीची दुकाने आणि मोठी गोदामे आहेत.

या परिसरात गेले काही वर्षे वारंवार आगी लागून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर घातक वायूंचे प्रदूषण (Hazardous gas pollution) झालेले आहे आणि होत आहे, पिंपरी चिंचवड मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांचेकडे आतापर्यंत किती आगी आणि का लागल्या याचा तपशीलवार लेखाजोखा आहे.

मात्र सर्व सुरक्षा आणि पर्यावरण नियमांचे उलंघन करणार्‍या या दुकानाकडे मनपा आणि संबंधित सरकारी खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे येथे वारंवार आगी लागतात, नागरिकाना श्वसनाचे त्रास होतो, त्यामुळे ही सर्व भंगार मालाची दुकाने तातडीने बंद करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र भंगार प्रोसेस पार्क एमआयडीसी च्या अखत्यारीत द्यावा, अशी मागणी चिखली – मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदना द्वारे केली आहे. pcmc news

याबाबत माध्यमांशी बोलताना संजीवन सांगळे यांनी सांगितले की, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने धोकादायक मानवी आरोग्य आणि नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यातील वस्तू, उपपदार्थ यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष कायदे आणि नियम केलेले आहेत.

चिखली कुदळवाडीतील (pcmc) भंगार दुकानात टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, रंग-गाळ, तेल, राख, जड धातू, टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल फोन, संगणक, वापरलेले युनिफॉर्म, हातमोजे, पायमोजे, बूट ई वस्तूची भंगार श्रेणीत वर्ग केलेल्या औद्योगिक स्क्रॅप असते, या दुकानांच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात विकसित मोठ्या प्रमाणात रहिवासी नागरी लोकसंख्या आहे.

परिसर स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटीच्या संकल्पना आणि शासनाचे एकूण पर्यावरण स्नेही व मानवी वस्तीला सुखकर सुरक्षित ठेवण्यासाठी रहिवासी झोन मध्ये स्क्रॅप संकलन, विघटन, वर्गीकरण दुकाने असता कामा नयेत, अशा मुळे मोठ्या आगी लागून धोकादायक स्थिती (unsafe condition) कायम राहते, आग विझवण्यासाठी चिखली, कुदळवाडीत सतत अग्निशामक दल येणे हे नित्याचे झाले आहे, त्यामुळे ही सर्व दुकाने तातडीने बंद करून त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र स्क्रॅप प्रोसेसिंग पार्क द्यावा, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात


संबंधित लेख

लोकप्रिय