Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याIMD alert : राज्यात उष्णतेची लाट सुरू, कर्जत ४४.४

IMD alert : राज्यात उष्णतेची लाट सुरू, कर्जत ४४.४

IMD : संपूर्ण राज्यात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यातील सरासरी तापमान ४१ डिग्री होते, हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यामध्येच उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर केले आहे, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान ४१ अंशांवर गेले आहे.

आज ठाणे जिल्ह्यातील कर्जतचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअसवर गेल्याने ते सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे, उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. आजचे राज्यातील प्रमुख शहरातील तापमान नोंद खालील प्रमाणे आहे.

पुणे ४०.७, धुळे ४२.०, नगर ४०.०, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३९.७, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.७, निफाड ३९.७, सांगली ४१.०, सातारा ४०.३, सोलापूर ४१.७, सांताक्रूझ ३९.७, डहाणू ३६.२, रत्नागिरी ३३.८, छत्रपती संभाजीनगर ४०.५, नांदेड ४०.६, परभणी ४१.०, अकोला ४१.७, अमरावती ३८.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ३९.८, गडचिरोली ३९.२, गोंदिया ३९.२, नागपूर ३९.०, वर्धा ४०.०, वाशीम ४०.२, यवतमाळ ४०.०.

पुढील तीन दिवस अती उष्ण लाटेचे आहेत असा इशारा हवामान खात्याने (IMD) ने दिला आहे.

नागरिकांनी उष्माघात होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळ होणं, शरीराचं तापमान जास्त वाढणं, पोटात कळ येणं. शरीरातील पाणी कमी होणं ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते, तेव्हा उन्हात फिरणे, खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक साधे सुती कपडे, डोक्याला पांढरा रुमाल अशी वेशभूषा ठेवा, शक्यतो टाईट कपडे घालून दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा.

डॉक्टरच्या सल्ल्याने आहार घ्यावा, दररोज 8 ते 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्या, नारळपाणी, ताक, लस्सी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस पावडर पाण्यात टाकून घेत राहावी. मद्यप्राशन टाळावे, असा आरोग्य तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय