लोक त्रस्त आहेत, समस्यांनी ग्रस्त आहेत, माझ्याकडे विकासाचा अजेंडा आहे – संजोग वाघेरे पाटील (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१७ – मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी रायगड आणि पुणे जिल्ह्यातील गाव भेटीतून मोठी जनसंपर्क मोहीम राबवली आहे.
पुण्याच्या शहरी भागातील पिंपरी, चिंचवड, मावळ तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या विधानसभा मतदार संघात त्यांनी सुरवातीपासून पदयात्रा, चावडी बैठका द्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि मशाल चिन्ह त्यांनी गावोगावी लोकप्रिय केले आहे. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील (mahavikas aghadi) घटक पक्षाचे प्रमुख संघटक पदाधिकारी दौऱ्यामध्ये असतात. pcmc news
ग्रामीण व शहरी भागातील राज्यातील सर्वात मोठ्या लोकसभा मतदार संघात मी माझा स्वतंत्र अजेंडा घेऊन प्रचार करत आहे, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही, माझ्या राजकीय जीवनात मी सुसंकृत आणि सभ्य संस्कृती जपलेली आहे, मी व्यक्तिगत टीका कोणावरही केलेली नाही, त्यांना सत्तेचा अहंकार जडलेला आहे, श्रीरंग बारणे यांनी माझ्याबद्दल केलेले विधान हे बालिशपणाचे असून १९८७ पासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात आमचे मोठे योगदान आहे. मी आणि माझे वडिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर म्हणून काम केले आहे. माझी पत्नी गेली पंधरा वर्षे नगरसेविका आहे त्यामुळे बारणे यांचा अभ्यास कमी आहे, असे संजोग वाघेरे पाटील आकुर्डी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. pcmc news
आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात रहात आहोत, तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे. गेल्या दहा वर्षात मावळचे खासदारपद असून सुद्धा त्यांनी मतदारसंघात (Loksabha election) एकही नवीन प्रकल्प आणला नाही, अशी टीका मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आकुर्डी येथील पत्रकार परिषदेत केली.
लोक त्रस्त आहेत,समस्यांनी ग्रस्त आहेत – संजोग वाघेरे पाटील
भाजपच्या दहा वर्षाच्या सत्तेच्या काळात एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, मावळ लोकसभा मतदार संघ (Maval loksabha 2024) शहरी व ग्रामीण नागरिकांचा आहे, येथील कामगार वर्ग, मध्यमवर्ग, व्यावसायिक, लघु उद्योजक, शेतकरी यांचे विविध प्रश्न आहेत, लोक त्रस्त आहेत, समस्यांनी ग्रस्त आहेत. या सर्व समस्या मला सोडवायच्या आहेत, मावळ मतदारसंघात एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रायगड आणि पुणे जिल्ह्यात पसरलेला माझा मावळ लोकसभा मतदार संघ आहे, मतदारसंघात औद्योगिक पट्टा मोठा असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे विविध स्तरावर येथील समस्यांची वर्गवारी करून ते प्रश्न सोडवणे हा माझा प्रचाराचा अजेंडा आहे, असे संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. pcmc news
येत्या मंगळवारी मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरणार असून सेनाप्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडीच्या वतीने आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, शहराध्यक्षा मीना जावळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, मानव कांबळे, मारुती भापकर, अनिता तुतारे, ज्योती निंबाळकर आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल
…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात
मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे
ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात
मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?
ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी