Junnar : पेसा (पंचायती राज विस्तार) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालेकर सर यांनी केले. त्यांनी ग्रामसभांमध्ये पेसा कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आणि लोकहितासाठी जास्तीत जास्त निर्णय घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण सरपंच यांनी केले. त्यांनी पेसा कायद्याच्या आधारे ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घेण्याचा मानस व्यक्त केला तसेच निर्णय प्रक्रियेत लोकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचे महत्व अधोरेखित केले. (Junnar)
ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेळके यांनी पेसा कायद्याच्या निर्मितीपासून अंमलबजावणीपर्यंतच्या उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत गवारी यांनी केले, तर आभार राहुल मते यांनी मानले.
कार्यक्रमाला महिला, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये राजेंद्र शेळके, बबाबाई सांगडे, लीलाबाई सांगडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे गावात पेसा कायद्याविषयी जागरूकता वाढली असून, लोकांच्या सहभागाने ग्रामविकासाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
(Junnar)
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ