Junnar / आनंद कांबळे : ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे – खैरे च्या वतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे येथील प्रांगणात पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळू केदारी होते.
यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय साबळे, माजी उपसरपंच रामदास झाडे, पेसा अध्यक्ष नवनाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा मोडक, पेसा सदस्या कमल गागरे, सामजिक कार्यकर्ते विलास मोरे, सुदाम लांडे, शाळेचे मुख्याध्यापक यु. एच. भोसले, पेसा मोबिलायझर लता केदारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. संजय साबळे म्हणाले, “पेसा कायदा हा आदिवासींचा स्वशासन कायदा आहे. आदिवासींच्या रूढी, परंपरा, चालिरिती यांचे जतन व्हावे, आदिवासीचे हक्क व अधिकार अबाधित रहावे यासाठी पेसा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी आदिवासी समाज आणि लोकप्रतिनिधी यांनी कायदा समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामसभांना पेसा कायदाने निधी बरोबर इतरही महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण पेसा कायद्याची अंमलबजावणी करू शकलो तर निश्चितपणे आदिवासी भागातील सर्वांगीण विकास साधता येईल असेही प्रा. साबळे म्हणाले. यावेळी सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी. यु. गाढवे यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी योगेश मोडक यांच्यासह शिक्षकवृंद एस. बी.घोळवे, ई. जे.वीर, आर. के. आले, एस. व्ही. थोरात, श्रीमती व्ही. एस.शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Junnar
हे ही वाचा :
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले