Tuesday, January 21, 2025

PCMC : एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे झाले. संगीत, कला, नृत्य तसेच प्रादेशिक लोकगीतांचा अविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जोपासण्याचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी दिला. (PCMC)

रंगीबेरंगी पोशाखातील सहभागी उत्साही विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अहवाल वाचनानंतर ‘एंडेव्हर’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालक, प्रतिनिधी ॲड. प्रीती सिंग, शिवाजी पाटील, दिपाली दातार, निकू मोनी, एसबीपीआयएमचे प्रा. डॉ. स्वप्नील सोनकांबळे, रेशू अग्रवाल, उपप्राचार्य पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना नाताळ व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. (PCMC)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

Related Articles

- Advertisement -

Latest Articles