Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : महिलांवरील लैंगिक अत्याचार, हत्या - नव्या कठोर सुरक्षा कायद्याची गरज...

PCMC : महिलांवरील लैंगिक अत्याचार, हत्या – नव्या कठोर सुरक्षा कायद्याची गरज ; विविध प्रतिक्रिया

PCMC : महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा सामूहिक बलात्कार आणि हत्येमुळे देशभर उग्र उद्रेक निर्माण होऊन सर्वत्र संतप्त आंदोलनामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 2022 मध्ये महिलांविरुद्ध 445,256 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात सुमारे 32,000 बलात्काराचे प्रकरणे होती, जी 2020 मध्ये सुमारे 28,000 होती. सरकारी डेटा अनुसार, 2011 मध्ये एका महिलेला प्रत्येक 20 मिनिटांत बलात्कार झाला. ते 2021 पर्यंत सुमारे प्रत्येक 16 मिनिटांत झाले.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, 2023 मध्ये महाराष्ट्रात 7,521 बलात्काराचे प्रकरणे नोंदवली गेली, जी 2020-21 मध्ये 5,954 होती. महिलांच्या लाखावार गुन्ह्यांची संख्या 2021-22 मध्ये 66 होती, ती 2022-23 मध्ये 76 झाली.

पिंपरी चिंचवड शहरात नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया…

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था निराशाजनक – वृक्षमित्र अरुण पवार

आजची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था निराशाजनक आहे. या आधुनिक युगात महाराष्ट्र राज्याने स्त्री स्वातंत्र्य, समान अधिकार देशातील माता भगिनींना दिले आहेत. राष्ट्र संत आणि राष्ट्रीय पुढाऱ्यांनी स्त्रियांना देवता समान मानले आहे. परंतु देशात आणि समाजात असंस्कृत नासलेली पिढी तयार होत आहे. बालिका, माता भगिनी सुरक्षित राहिल्या नाहीत, त्यांना लैंगिक शोषणाचे सामूहिक बळी दिले जात आहे, पोलीस प्रशासन आणि राज्यकर्त्या वर्गाची दहशत संपली आहे. अशा काळात पुन्हा शिवरायांचे आदर्श समाज निर्मितीचे कठोर कायदे पुन्हा प्रस्थापित करायला हवेत. लोकशाही मध्ये दंडशक्तीचा धाक हवा.


आज शिवराय असते तर महिलांना कोणी हात लावू शकले नसते. – सरोज कदम, नेत्या, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. एक कठोर शिक्षेची व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. आजच्या काळातील महिला व मुलींवर अत्याचार व बलात्कार होण्याचे प्रमाण का वाढले आहे? आज महाराष्ट्रात दररोज गावागावात, शहरातील मुली व महिलांवर अत्याचार व बलात्कार होत आहेत. त्यांची छेडछाड काढणे, त्यांना अश्लील बोलणे, वाईट नजरेने पहाणे. असे प्रकार चालले आहेत. पोलीस व कायद्याची भिती राहीलेली नाही. अशा वेळेस प्रत्येक गावातील व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तांनी एकत्र येऊन महीला व मुली यांचे रक्षण करणे आवश्यक झालेले आहे.


कठोर कायदे असूनही, दहशत बसेल अशा शिक्षा नाहीत, गुन्हेगार सोकावळे आहेत – सिता ताई केंद्रे, (अध्यक्षा, संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट, चिखली)

येत्या काळात महाराष्ट्रातील कोणत्याच गावात किंवा शहरात एकाही मुलगी किंवा महीलेवर बलात्कार व अत्याचार होणार नाही, यासाठी सरकारने दामिनी पथकांची संख्या वाढवली पाहिजे. नोकरदार महिला, महाविद्यालयीन ठिकाणे येथील महिला सुरक्षा वाढवली पाहिजे. शहरात, तालुक्याच्या ठिकाणी महिला बीट मार्शल पथके पोलीस आयुक्त साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत केली पाहिजेत. महिला पोलिस चौक्या वाढवल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील. गुंडांना दहशत बसेल. सामजिक शांतता आणि भयमुक्त वातावरण निर्माण होईल.


कायद्याची भीती वाटत नाही, काही दिवसानंतर उद्रेक शांत होतो – काशिनाथ नखाते (कामगार नेते,कष्टकरी संघर्ष महासंघ)

या आरोपींना महीला व मुलींवर बलात्कार व अत्याचार करताना, छेडछाड काढताना पोलीस व कायद्याची भिती का वाटत नाही? जर त्यांना पोलीस व कायद्याची भिती वाटत नसेल तर मग त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची भिती वाटायलाच हवी. २०१८ मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार दर १५ मिनिटाला भारतामध्ये बलात्कार होतो. २०१९ मध्ये ३०,६४१ इतक्या बलात्काराच्या तक्रारींची नोंद झाली होती. अशा आकडेवारीतून देशातील महिला सुरक्षा धोरण प्रभावी नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अपुरा पोलिस तपास, बलात्काराच्या आरोपींविरोधात प्रभावी खटला तयार करण्यात वकिलाचे अपयश, पीडितांना धमकाविणे, तसेच पोलीसदलातील भ्रष्टाचार आणि आरोपींची निर्दोष मुक्तता यामुळे पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे.

२०१४–१५ मध्ये पार्टनर फॉर लॉ इन डेव्हलपमेंटने दिल्ली येथे बलात्काराच्या खटल्यासंदर्भात अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की, आरोपी व्यक्ती ही पीडित स्त्रीच्या ओळखी मधील होती; तक्रार दाखल करताना तसेच वैद्यकीय चाचणीदरम्यान विविध समस्यांना सामोरे जावे लागले; तक्रार दाखल करण्याआधी आरोपीने तक्रार न देण्यासाठी पीडितेला धमकाविले होते; महिलांना लैंगिक शोषणाचे बळी पडावे लागते. बीभत्स मनोवृत्ती मुळे स्त्रियांची लैंगिक पिळवणूक होते, विशेषतः कलकत्ता ते बदलापूर या काही घटना मध्ये चारित्र तपासणी न करता आरोपी काम करत होते. लहान मुलांवर होणारे अत्याचार चिंताजनक आहेत.


महिला कामगारांना सुरक्षित जॉब मिळाले पाहिजेत – जीवन येळवंडे (स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना)

आज महाराष्ट्रात महीला व मुलींकडे वाईट नजरेने बघणे, त्यांची छेडछाड काढणे, त्यांना अश्लील बोलणे, त्यांना किळसवाणे स्पर्श जबरदस्तीने करणे, त्यांना भिती दाखवून, फसवून नेऊन अत्याचार करणे आणी नंतर त्यांना जाळुन मारणे किंवा त्यांचा खून करणे. असे प्रकार दररोज का बरे घडत आहेत? अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी पडत आहेत, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (sexual harrasment) वाढत आहेत. औद्योगिक किंवा अन्य सेवा क्षेत्रात ठेका कामगारांमध्ये तरुण महिला मुलींचे कामगार म्हणून असंघटीत क्षेत्र अलीकडच्या दशकात वाढले आहे. युनियनचे पाठबळ नाही, युनियन बनणार नाही, असे कामगार कायदे बदलले आहेत, विशाखा समिती कागदावर आहे. नोकरभरती करताना चारित्र्य तपासणी केली जात नाही. एकूण देशात आणि राज्यात बलात्कार आणि हत्या वाढत आहेत,क्राईम रिपोर्ट नुसार देशात दररोज ८० लैंगिक गुन्हे घडत आहेत. स्वतंत्र महिला पोलीस स्टेशनची गरज आहे, महिलांना सुरक्षितता निर्माण करून सेफ वर्किंग साठी स्वतंत्र नियम असले पाहिजेत, क्रूर पणे केलेल्या हत्यांचा तपास आणि शिक्षा यामध्ये विसंगत प्रमाण आहे. कामगार संघटनांनी लैंगिक गुन्हेगारी नियंत्रण साठी व्यापक भूमिका घेतली पाहिजे.


शहरात नोकरदार महिला, महाविद्यालयीन युवती हा खरोखर सुरक्षित आहेत का – सोनाली डावरे (वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड)

रयतेचा राजा शिव छत्रपतींचा आदर्श आम्ही मानतो. शिवरायांचे विचार समाजात स्त्री शक्तीला बळकट करणारे होते,  शिवाजी महाराज यांच्याविषयी मनात प्रेम व आदर आहे अशा युवकांनी महीला व मुलींवर होणारे बलात्कार व छेडछाड यापासून त्यांना वाचवले तर ती महाराजांना सर्वात आवडणारी भेट ठरेल. आज शहरात नोकरदार महिला, महाविद्यालयीन युवती हा खरोखर सुरक्षित आहेत का, हे पुन्हा तपासले पाहिजे.


कठोर कायदे असूनही हे गुन्हे का घडत आहेत. याबद्दल पुन्हा आढावा घ्यावा लागेल – सोनाली शिंदे, (वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड)

छेडछाड, बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरिल इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा तातडीने केला पाहिजे. महिलांवरील अत्याचार गुन्हे आणि शिक्षा यासंबंधी नव्या सुरक्षा प्रणाली सरकारने राबवल्या पाहिजेत. कठोर कायदे असूनही हे गुन्हे का घडत आहेत. याबद्दल पुन्हा आढावा घ्यावा लागेल.

शब्दांकन – क्रांतीकुमार कडुलकर

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

संतापजनक : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय