Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिघीत अद्यावत अग्निशामक केंद्र, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन

PCMC : दिघीत अद्यावत अग्निशामक केंद्र, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दिघीमध्ये अद्यावत अग्निशामक केंद्र होणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजन भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे दिघी व बोपखेल परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या केंद्रासाठी भाजपचे माजी नगरसेवक विकास डोळस, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. (PCMC)

उद्घाटनावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख विकास डोळस, दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, भाजपचे माजी चिटणीस कुलदिप परांडे, संजय गायकवाड, माजी सैनिक आमसिध्द भिसे, ज्येष्ठ नागरिक पांडूरंग वाळके,उमेदसिंह पनवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे दिघी – बोपखेल परिसरात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या परिसरातील लोकसंख्या 70 हजारांहून अधिक आहे. दिघीगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1997 ला समावेश झाला. यावेळी झालेल्या डीपी प्लॅनमध्ये 37 आरक्षणे जाहीर करण्यात आली. परंतु, यामधील शाळेची इमारत वगळता एकही आरक्षण विकसित करण्यात आले नव्हते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आरक्षण ताब्यात घेऊन विकसित करण्यावर भर दिला. (PCMC)

दिघी-बोपखेल परिसरात एखादी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास येथील नागरीकांना भोसरीतील अग्निशमन केंद्रावर अवलंबून रहावे लागत होते. त्यात वेळ जात होता. परिणामी, आग विझविण्यास विलंब होत असे, नागरिकांचे अधिकचे नुकसान होत होते. त्यामुळे दिघीसाठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र सुरु करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार लांडगे यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. त्यानुसार आरक्षण ताब्यात घेतले. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन निविदा प्रक्रिया राबविली. आता कामाचे भूमीपूजनही झाले. त्यामुळे लवकरात-लवकर काम पूर्ण केले जाणार असल्याचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख विकास डोळस यांनी सांगितले.

कोट

दिघी-बोपखेलसह समाविष्ट गावांमध्ये विकासाकामाचा मोठा ‘बॅकलॉग’ राहिला होता. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर हा ‘बॅकलॉग’भरून काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे समाविष्ट भागाचा विकास झाला आहे. या भागात राहण्यासाठी नागरिकांची पसंती मिळत आहे. मोशीत 650 बेडचे रुग्णालय होत आहे.

महेश लांडगे, भाजप आमदार भोसरी

संबंधित लेख

लोकप्रिय