पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून यशवर्धन अगरवाल तर मुलींच्या गटातून अवनी खंडेलवाल यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन मासुळकर कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. आज १९ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून जिल्हास्तरीय १९ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत चॅलेंजर पब्लिक स्कूल च्या यशवर्धन अगरवाल याने प्रथम क्रमांक पटकावला असून पिंपरी येथील जी.जी.आय स्कूलच्या लक्ष वाधवा याने द्वितीय क्रमांक तर इंदिरा नॅशनल स्कूलच्या अभिषेक पिल्हे याने तृतीय क्रमांक पटकावला. चिंचवड येथील पोदार स्कूलचा श्रेयस रावत याने चतुर्थ तर चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेच्या सिध्देश हारपळे याने या स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. (PCMC)
जिल्हास्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत निगडी येथील सिटी प्राईड ज्युनियर कॉलेजची अवनी खंडेलवाल ही अव्वल ठरली असून पिंपरी येथील जयहिंद ज्युनियर कॉलेजची श्रावणी नवलाखे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक तर पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटीलच्या ख़ुशी माईनकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला. चिंचवड येथील एल्प्रो स्कूलची चेतना कटारिया या विद्यार्थिनीने चौथा तर निगडी येथील अमृता विद्यामंदिर येथील रिद्धी कटारिया या विद्यार्थिनीने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
PCMC : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत यशवर्धन अगरवाल, अवनी खंडेलवाल अव्वल स्थानी
संबंधित लेख