पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजना व मोहिमांनमध्ये माता व बालक हे महत्वाचे घटक असल्यामुळे बालकांच्या आरोग्यासाठी विविध मोहिमांची अंमलबजावणी करण्यात येते आहे. National Health Mission pcmc
राज्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियांनाचे एक महत्वाचे उदिष्ट आहे. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार (जुलाब diarrhea) हे प्रमुख कारण असुन ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त आढळुन येते.
अतिसारामुळे होणारे मृत्यु ओआरएस व झिंकच्या (गोळया) वापरामुळे टाळता येऊ शकतात. अतिसार रुग्णांचे उपचार आणि दक्षता याबाबत जनजागृती व्हावी यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ०६ जुन २०२४ ते २१ जुन २०२४ या कालावधीत “विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा” राबविण्यात येत आहे. Special Diarrhea Control Fortnight
सदर मोहिमे दरम्यान शहरातील झोपडपट्टी भागात आशा स्वयंसेविका यांचे मार्फत शुन्य ते पाच वर्षाखालील बालके असलेल्या घरास भेट देऊन विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा बाबतचे महत्व सांगण्यात येत आहे. तसेच तीव्र स्वरुपाचे अतिसार असलेल्या बालकास रुग्णालयात उपचाराकरीता संदर्भित करण्यात येणार आहेत व ज्या बालकांस अल्प स्वरुपाचे अतिसार आहे अशा बालकांना ओआरएस पाकीट सदर बालकांचे मातेकडे देण्यात येते व ओआरएस मिश्रण तयार करणेबाबत माहिती देण्यात येत आहे. pcmc
सदर कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दवाखाना व रुग्णालयामध्ये ओ.आर.एस. / झिंक कॉर्नरची स्थापना केलेली आहे.
पाच वर्षाखालील मुले असलेल्या कुटुंबांना ओ.आर.एस./ झिंक गोळयाचे वाटप करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सदर मोहिमेची व्यापक जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (pcmc) सर्व दवाखाना / रुग्णालयात अतिसार आजाराविषयी बॅनर व पोस्टर्स नागरिकांना माहितीसाठी लावण्यात आलेले आहेत.
तसेच शहरातील झोपडपट्टी भागात घरोघरी येणाऱ्या आशा/ आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत स्वच्छतेचे महत्व, ओआरएस मिश्रण, हात धुण्याचे कौशल्य याबाबत माहिती देण्यात येत असून अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे ध्येय साध्य करण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. pcmc
हेही वाचा :
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत