Saturday, April 27, 2024
Homeजिल्हाParbhani : डीवायएफआय कडून शहिदांना अभिवादन!

Parbhani : डीवायएफआय कडून शहिदांना अभिवादन!

Parbhani : 23 मार्च शहीद दिनानिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) पूर्णा समितीकडून कँडल मार्च काढत शहिदांना अभिवादन करण्यात आले. Parbhani

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारकांना ३१ मार्च १९३१ ला इंग्रजांनी फासावर लटकवले होते. या क्रांतिकारकांनी ऐन तारुण्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली होती. त्यांचे बलिदान विद्यार्थी, युवा पिढीला आणि सामान्य नागरिकांना आठवत रहावे, त्यांनी केलेले कार्य व त्यांचे विचार युवा पिढीने पुढे न्यावे अशा उद्देशाने संघटनेने या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

डीवायएफआय दरवर्षी या क्रांतिकारकांना विविध पद्धतीने अभिवादन करीत असते. मागच्या वर्षी त्यांनी विद्यार्थी युवकांचे शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांना घेऊन पूर्णा ते परभणी दोन दिवसीय पायी मोर्चा काढत त्यांना अभिवादन केले होते. यावर्षी पूर्णेत कँडल मार्च काढण्याचे नियोजन केले होते.

कँडल मार्च मध्ये संघटनेचे कॉम्रेड नसीर शेख, जय एंगडे, अजय खंदारे, प्रबुद्ध काळे, अमोल पट्टेकर, सुबोध खंदारे, भूषण भुजबळ, गंगाधर प्रजापती, राज जोंधळे, वैभव जाधव, रत्नदीप काळे, दुर्गेश वाघमारे, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, तिरुपती वाघमारे, दिपक उफाडे, प्रतिक एंगडे, यश सुरडकर, सूरज फुलझळके, कृष्णा काकडे, सूरज जावडे, ओंकार सूर्यवंशी, रितेश देसाई आदींसह सहभागी झाले होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय