Friday, November 22, 2024
Homeलोकसभा २०२४PANVEL : संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग

PANVEL : संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रियपणाबद्दल नाराजीचा सूर हा यत्र तत्र सर्वत्र असा उमटत आहे. आता हवा खासदार नवा! अशी जनभावना मावळ लोकसभा मतदारसंघात उमटत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी (दि.७) पनवेलमध्ये आला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या समोरील मशालीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे विनंती यावेळी मतदारांना केली. panvel news

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८९ पनवेल विधानसभा क्षेत्र निर्णायक समजले जाते. या ठिकाणी सत्ता सोपानावर झुलणाऱ्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. जनसामान्यांसाठी जीवनावश्यक सेवासुविधा पुरवताना प्रशासनाला दमछाक होत आहे. लोकप्रतिनिधींचा कुठलाही स्वरूपाचा अंकुश प्रशासनावर नाही. विनंती, अर्ज, कामे, समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना विद्यमान खासदारांनी हे काम माझ्या अखात्यारित येत नाही, असे सांगत टोलावले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी प्रचारासाठी एक अनोखी क्लृप्ती वापरली. सकाळी लवकर उठून चालायला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुंदर प्रतिसाद मिळाला. panvel news

संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने नवा खासदार आणि जनतेची काम करणारा खासदार आम्हाला मिळेल, अशी नभावना येथे उमटून आली.

वडाळे तलाव हा पनवेलच्या शिरपेचातील मुकुटमणी समजला जातो. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. विशेष म्हणजे यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश असतो. अबाल वृद्ध, महिला,तरुणाई यांची येथे रेलचेल असते. या साऱ्यांशी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिका-यांनी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी उपस्थित मतदारांनी व्यक्त करत महाविकास आघा़डीला आणि संजोग वाघेरे पाटील यांना विजय करण्याचा निर्धार केला.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल शहर चिटणीस नंदू भोईर, शेकाप पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा ठोकळ,माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे जॉर्ज, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा माधुरी गोसावी,शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, बाबू जाधव जॉन्सन जॉर्ज मंगेश अपराज, बी. पी. म्हात्रे, डी. बी. म्हात्रे, कविता ठाकूर, वैभव जोशी आदींची उपस्थिती होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख

लोकप्रिय