Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यया महाशिवरात्री निमित्त अशा बनवा भरपूर पोषण देणाऱ्या आणि चविष्ट अशा रताळ्याच्या...

या महाशिवरात्री निमित्त अशा बनवा भरपूर पोषण देणाऱ्या आणि चविष्ट अशा रताळ्याच्या खास रेसिपी

महाशिवरात्री हा मराठी महिन्यातील माघातील कृष्ण पक्षाच्या 14 व्या दिवशी साजरा केला जातो. हा हिंदूंच्या शुभ सणांपैकी एक आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. उपवास म्हटलं की काय खायचं असा एक प्रश्न आपल्यासमोर असतो. महाशिवरात्री हा वर्षातील उपवासाचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी साधारणपणे घरोघरी उपवास करण्याची रीत आहे. साबुदाणा, बटाटा हे पदार्थ वातुळ असल्याने शक्यतो टाळले जातात. घरात लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील तर त्यांनाही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशा रताळ्याचा वापर या दिवशी करता येतो. भरपूर पोषण देणारे आणि चविष्ट लागणारी ही रताळी आपण बाजारातून आणतो खरी पण त्याचे काय करायचे हे अनेकदा आपल्याला सुचत नाही. मग कधी रताळी नुसतीच उकडून खाल्ली जातात तर कधी त्यात गूळ घालून खाल्ली जातात. पण या रताळ्याच्या ३ झटपट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ज्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतील


रताळे कंदमुळं

रताळे जमीनीत उगवणारे कंदमूळ आहे.
त्यामुळेच रताळ्यापासून उपवासात विविध पदार्थ केले जातात.शिवाय रताळ्यापासून केले जाणारे पदार्थ हे उपवासात पोटभरीचे जेवण देतात. रताळ्यापासून खीर,तसेच रताळ्याचा उपमा ,रताळ्यापासून गुलाबजाम,रताळ्याचे थालीपीठ, रताळ्यापासून कटलेट्स,रताळे गॅस वर उकडून घ्यावेत असे खाल्याने सुध्दा छान लागतात. रताळ्यात फायबर खूप प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच पचन व्यवस्थित होते.बद्धकोष्ठता कमी प्रमाणात होते. रताळे नियमित आहारात समावेश असेल तर आपल्या वजनावर नियंत्रण येते.

महाशिवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. ज्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास देखील करतात. उपवासाच्या दिवशी फळे खाल्ली जातात. अनेकांना उपवास करताना खूप अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अशा डिशबद्दल सांगणार आहोत, जे खाल्ल्यानंतर तुम्ही उपवासात दिवसभर उत्साही राहाल.


रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज

साहित्य
:–
१ किलो रताळी
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरे
१ इंच आले
तेल
मीठ चवीनुसार

कृती
प्रथम रताळे मीठ टाकून शिजवून घ्यावेत. पुर्ण शिजल्या थंड झाल्यावर सर्व रताळ्याची साले काढून घ्यावेत. सर्व एकत्र करून रताळे कुस्करून घ्यावेत.नंतर त्यात मिरच्या , जीरे, आले, मीठ चवीनुसार घालून पिठाच्या गोळ्या सारखे मळून घ्यावेत,१० मीनटे रेस्ट द्यावी. मग गोळे करुन घ्यावेत,एक प्लास्टिक पेपर घेऊन त्यावर एक एक गोळा ठेवून तेल लावून थापावे आणी तेल किंवा तूप लावून खमंग भाजून खाण्यास रेडी आहे रताळ्याचे थालीपीठ.
On this Mahashivratri make these special sweet potato recipes that are nutritious and tasty


रताळ्याची खीर

एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचं. त्यावर एक जाळी ठेवून त्यामध्ये रताळी स्वच्छ धुवून ठेवायची. वरुन झाकण ठेवले किंवा नाही ठेवले तरी चालेल. अगदी ५ मिनीटांत ही रताळी मस्त शिजतात. मग काही वेळ ती गार होऊ द्यायची आणि त्याची साले काढायची. किसणीने ही रताळी चांगली किसून घ्यायची आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हा किस घालायचा.

रताळ्याच्या या किसामध्ये चमचाभर तूप आणि अगदी चवीला थोडासा गूळ घालायचा. कढईमध्ये हे सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे आणि मग त्यामध्ये थोडेसे दूध घालून ते शिजवायचे. सगळ्यात शेवटी त्यामध्ये जायफळ पूड किंवा वेलची पूड आवडीप्रमाणे घालायची. ही गरमागरम खीर लहान मुलं अतिशय आवडीने खातात आणि त्यांना ताकद यायलाही या कंदमुळाची चांगली मदत होते.

‘गगनयान’ मोहिमेत ‘हे’ चार अंतराळवीर, पंतप्रधान मोदींनी केली नावांची घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘भीम टोला’ आंदोलन, पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय