Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘भीम टोला’ आंदोलन, पोलिस आणि आंदोलकांमध्ये...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘भीम टोला’ आंदोलन, पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड

औंरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी तसेच भ्रष्ट प्रभारी कुलसचिव प्रशांत अमृतकर यांची हकालपट्टी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपयोजना करावी अशा विविध मागण्यांसाठी ‘भीम टोला’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाल्याचे बघायला मिळाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यापीठात भगवे फडके बांधून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठात राडा करण्यात आला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास देण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असा आरोप डाव्या, पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी केला आहे. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी घडलेली घटना ही कुलगुरू यांच्या समोर घडली असताना त्यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा देखील आरोप विद्यार्थ्याचा आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :

1) दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी धुडगूस घालणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सक्षम व पूर्णवेळ अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल करण्यात यावा.
2) ऑक्टोबर 2023 ला अभाविप ने केलेल्या विद्रुपीकरण आरोपींकडूनची नुकसान भरपाई घेण्यात यावी.
3) विद्यापीठाच्या हद्दी खुणा निश्चित करून संरक्षण भिंत उभारण्यात यावी.
4) विद्यापीठ परिसरातील यशवंत वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने कराराचे उल्लंघन केलेले असल्याने त्यांच्या वापरात नसलेली जागा तात्काळ ताब्यात घ्यावी व हे वसतिगृह 100% विद्यापीठातील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देण्यात यावे.
5) भ्रष्टाचार व लाचखोरीचा गंभीर आरोप असणारे डॉ. प्रशांत अमृतकर यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी.

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

मोठी बातमी : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय