Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याCNG Price : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

CNG Price : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

CNG : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सूरू आहे. निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर विविध वस्तूंच्या किंमती कमी होताना दिसतात. अशातच सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सीएनजीच्या दरात मोठी कपात (CNG Price) करण्यात आली आहे. 

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन दरानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 73.40 रुपये इतका झाला आहे. म्हणजेच सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात झाली आहे. महागाईच्या काळात सीएनजीच्या किमतीत झालेली ही कपात सामान्यांना दिलासा देणारी आहे. मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

सध्या जनता महागाईने हैराण झाली आहे. अशात ही दर कपात सर्वसामान्यांना एक दिलासादायक आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरात सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांनी घट झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा विचार केल्यास नव्या दरकपातीमुळे सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा 53 टक्के अधिक स्वस्त आहे. सध्याचे मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर मागील अनेक महिन्यांपासून 105 ते 110 रुपयांदरम्यान आहेत.

गॅसचा उत्पादन खर्च कमी झाल्याने सीएनजीच्या किमती कमी झाल्याची माहिती एमजीएलने मंगळवारी संध्याकाळी उशिरा एक निवेदन जारी करून दिली.

दरम्यान, दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलो आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ही किंमत 81.20 रुपये प्रति किलो आहे. 

हे ही वाचा :

Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान

सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

Jalgaon : जळगाव पोलिस विभाग अंतर्गत 137 जागांसाठी भरती

Nashik : नाशिक पोलिस विभाग अंतर्गत 118 जागांसाठी भरती

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय