Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याशाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

Shahrukh Khan : श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये देशातील नव्हे तर जगभरातील श्रीमंत उद्योगपती, दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यासोहळ्यामध्ये शाहरूख खानने (Shahrukh Khan) सूत्रसंचालन केले. यावेळी बोलत असताना शाहरूख खानने जय श्रीरामचा नारा लगावला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग विवाह सोहळ्याचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या सोहळ्यातील शाहरूख खानचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये शाहरूख खान सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सूत्रसंचालन करत असताना त्याने जय श्रीराम नारा लगावला आहे. कोणतंही शुभ काम करताना देवाचं नाव घ्यायला हवं असं शाहरूखने म्हटले आहे हा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

या दरम्यान त्यांनी मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी, पूर्णिमा दलाल (नीता अंबानीची आई) आणि देवयानी खिमजी (राधिका मर्चंटची आजी) यांची अंबानी कुटुंबातील ‘तीन महिला’ म्हणून ओळख करून दिली.

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग शुट सोहळ्याला मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स यांसह देश विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित होते. बॉलिवूडमधील अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिन्ही खान देखील उपस्थित होते. सोबतच हॉलिवूडमधील रिहाना देखील उपस्थित होती.

आमिरने त्याच्या प्रसिद्ध ‘मस्ती की पाठशाला’ (रंग दे बसंती) गाण्यावर नृत्य केले आणि शाहरुख खानने ‘चैन्या चैन्या’ (दिल से) वर नृत्य केले. यानंतर तिघांनीही ‘नाचो नाचो’ या ‘नातू नातू’च्या हिंदी आवृत्तीवर सादरीकरण केले. यांनी आपला परफॉर्मन्स करत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.

हे ही वाचा :

…तर आम्ही भाजप सोबत जाऊ, उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी तीन उमेदवार जाहीर, “हे” आहेत तीन उमेदवार

भाजपला आणखी एका बड्या नेत्याचा रामराम

Dhule : धुळे पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

Amravati : अमरावती पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख

लोकप्रिय