Friday, November 22, 2024
Homeलोकसभा २०२४Nitin gadkari: भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

Nitin gadkari: भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

Nitin gadkari: राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापले आहे. मात्र या उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांनी प्रचार करताना उन्हाचा तडाखाही बसताना दिसत आहे. वाशिम लोकसभा मतदार संघातील पुसदच्या सभेत भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना आज (दि.२४) दुपारी घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. (Nitin gadkari)

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली.

यवतमाळमध्ये प्रचंड तापामानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. ऊन सहन न झाल्याने काही मिनिटांतच त्यांना भोवळ आली.

26 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील प्रचार थांबणार असून
या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान पुसद येथे ही घटना घडली. शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी जाहीर सभेत मार्गदर्शन करीत होते. एकदम गर्दी करू नका, हवा येऊ द्या असे गडकरी तत्पूर्वी म्हणाले, त्याचवेळी बोलताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि व्यासपीठावरील नेते, पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी सावरत स्टेजच्या मागील बाजूला नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. Yavatmal news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय