Monday, May 6, 2024
Homeलोकसभा २०२४Maval : 'मनसे' चा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

Maval : ‘मनसे’ चा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

खालापुर : महाड येथील अंकल किचन बँक्वेट हॉल या ठिकाणी मावळचे खासदार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (shrirang barane) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. Maval news

या संबंधात मनसेचेे नेते नितीन सरदेसाई, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष तथा सरचिटणीस अमेय खोपकर, मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले, मनसे प्रवक्ते तथा पनवेल महानगराध्यक्ष योगेश चिले, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तसेच संदेश भाई ठाकूर तसेच रायगड (Raigd) जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. Maval news

मावळ लोकसभा मतदार संघात (maval loksabha 2024) संपूर्ण ताकदीनिशी खासदार श्रीरंग बारणे (shrirang barane) यांना पुन्हा प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यात येईल, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.


मनसे नेते नितीन सरदेसाई, अमय खोपकर, रणजित शिरोळे यांनी मांडला आणि त्याला सर्व पदाधिका-यांनी पाठींबा जाहिर केला. मनसे महायुतीच्या सोबत उभी राहिल्याने महायुतीची ताकत आता प्रचंड वाढली आहे, याचा आनंद आहे आणि मी जिंकणारच यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

मनसे प्रवक्ते योगेश जनार्दन चिले आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय