Wednesday, January 15, 2025
HomeNewsनांदेड : 23 जून ला आशा व गटप्रवर्तकांचे थाळीनाद आंदोलन, मागण्या मान्य...

नांदेड : 23 जून ला आशा व गटप्रवर्तकांचे थाळीनाद आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच

नांदेड, दि. 21 : दिनांक 23 जून 2021 रोजी आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करा व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचेना प्रमाणे किमान वेतन आशांना 18,000 रूपये व गट प्रवर्तक ताईंना 22,000 रूपये लागू करावेत व इतर मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर एक दिवशीय धरणे व  थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक ताईंनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन फेडरेशनच्या अध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार व सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे.

या राज्यव्यापी आंदोलनास अंगणवाडी फेडरेशनचा राज्यव्यापी पाठिंबा असून अंगणवाठडी फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्ष शततारका पांढरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. तसेच नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे, जि.प.सदस्या प्रणिती देवरे यांनी देखील आशांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात या साठी निवेदने दिले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय