Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत – शंकर जगताप यांचे आवाहन

महापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत – शंकर जगताप यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महापालिका विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ‘धन्वंतरी’ आरोग्य योजना लागू झाली. शिक्षकांनी आगामी काळात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ रहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. Municipal teachers should produce meritorious students – Shankar Jagtap’s appeal

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शिक्षक संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे.

महापालिका भवन येथे शिक्षक संघटना आणि प्रशासनाची बैठकीत धन्वंतरी योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्या निमित्त शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची कृतज्ञता भेट घेतली आणि या प्रश्नासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय येणारे, अनुसूचित जमातीचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास अंभोरे, पिंपरी चिंचवड मनापा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती शिवाजी दौंडकर, प्राथमिक शिक्षक परिषदेचे सरचिटणीस मंगेश भोंडवे यांच्यासह सतीश ढमाळ, सतीश गिड्डे, गोरक्षनाथ भांगरे, धर्मेंद्र भंगे, बिभीषण फलफले, शांताराम रोकडे, अनिल सुकाळे, चौगुले सर, शंकर पवार, बाबुराव लांघी आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत शिक्षक / सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकास ३०० रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांस १५० रुपये मासिक सभासद वर्गणी कपात करण्यात येईल. त्याआधारे संबंधित कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २०१३ च्या धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहेत.

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत !

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ मिळावा. यासाठी लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, हा प्रश्न तांत्रिक कारणास्तव मागे पडला होता. आता शिक्षक संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे मागणी केली. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या धोरणाप्रमाणे महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजना लागू केली आहे, असेही पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय