Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याAmol Kolhe: खासदार अमोल कोल्हेंचा आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झंझावती दौरा!

Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हेंचा आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झंझावती दौरा!

घोडेगाव : शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजता शिनोलीतुन सुरू झालेल्या दौऱ्यास शिनोली, डिंभे, फुलवले, कोकणेवाडी, बोरघर, माळीण अशा अनेक गावांत उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट, डॉ. हरिश खामकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पूजा वळसे, सुरेश निघोट, गंगापूर सरपंच संदिप येवले, नागापुर सरपंच गणेश यादव, बोरघर सरपंच विजय जंगले, उपसरपंच राजेश घोडे, चेअरमन सुरेश शेळके, हभप जंगले महाराज, आम आदमी पार्टी चे सलिम इनामदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या भागात फक्त भुमिपुजन, उद्घाटने सुरू पण कामे वर्षानुवर्षे तशीच खोळंबली असल्याने पाणी, विज, आरोग्य या प्राथमिक गरजांचीही पुरेशी पुर्तता झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थितांना आपल्या मागण्याची दखल घेतली असून योग्य त्या उपाययोजनांचे आश्वासन देऊन संबंधित अधिकारी वर्गाशी त्वरित फोनवर संपर्क साधून दप्तर दिरंगाई तर अडलेली किरकोळ कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय