Saturday, April 27, 2024
Homeकृषीआता शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार आधुनिक शेतीचे धडे

आता शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार आधुनिक शेतीचे धडे

पुणे : शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी कृषी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना श्रेणीऐवजी आता गुण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत आहे.

शेती विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील तज्ञांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. कृषी विषय हा कार्यानुभव विषयाचा एक भाग करण्यासाठी शिक्षण विभागाने नुकतीच एक बैठक घेतली. त्यात या विषयाला श्रेणीऐवजी गुण देण्याबाबत चर्चा झाली.

सहावी ते आठवीच्या वर्गामध्ये कृषी विषयाबाबत अभ्यासक्रम तयार आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून कृषी विभागासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून संबंधित प्रस्तावाचे सादरीकरण केले जाणार आहे. कृषी विषयाचे शालेय अभ्यासक्रमात नववी आणि दहावीसाठी स्वतंत्र विषय म्हणून घटकाचा समावेश केला जाणार आहे. याविषयी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त अहवालानुसार कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला जाणार आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

“सावित्रीमाई व अहिल्यादेवींचे” पुतळे हटवून सावरकर यांची जयंती साजरी, विरोधक आक्रमक

व्हिडीओ : भारताच्या हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘या’ सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय