Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुण्यात काही परिसरात गारपीट; पुढील चार दिवस वातावरण कसं असेल?

पुण्यात काही परिसरात गारपीट; पुढील चार दिवस वातावरण कसं असेल?

पिंपरी चिंचवड : पुणे तसेच आसपासच्या परिसरात दुपारी अचानक ढग आले आणि जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काही वेळातच पावसाने मोठा आकार घेऊन गारपीट झाली. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भुगाव, सांगवी, औंध या परिसरात गारपीट झाली तर बाकी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली.

त्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते. आज सकाळपासूनही उन्हाच्या झळा बसत होत्या. अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळं परिसरात गारवा निर्माण झाल्यानं शहरवासीय मात्र सुखावले आहेत.

पुढील पाच दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?

पुढील पाच दिवस पुण्यात काही प्रमाणात ऊन आणि काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या (30) दिवसभर काही प्रमाणात ऊन असेल मात्र संंध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणत पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा :

आता शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार आधुनिक शेतीचे धडे

ब्रेकिंग : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

“सावित्रीमाई व अहिल्यादेवींचे” पुतळे हटवून सावरकर यांची जयंती साजरी, विरोधक आक्रमक

व्हिडीओ : भारताच्या हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘या’ सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय