Tuesday, May 7, 2024
Homeराजकारण"सावित्रीमाई व अहिल्यादेवींचे" पुतळे हटवून सावरकर यांची जयंती साजरी, विरोधक आक्रमक

“सावित्रीमाई व अहिल्यादेवींचे” पुतळे हटवून सावरकर यांची जयंती साजरी, विरोधक आक्रमक

पुणे : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक असून, पुतळे हटवल्याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केली.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. भारतीय जनता पक्ष महिलांचा सन्मान करत नाही त्यांच्या महिला विरोधी मानसिकतेतूनच असे प्रकार घडत असतात.

सत्तेच्या बळावर भाजपा काहीही करु शकते, तेच महाराष्ट्र सदनातही झाले. सत्तेच्या बळावर नवा इतिहास निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात सदनात झालेला प्रकार चिड आणणार असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. जगाच्या पाठीवर महात्मा गांधी, बुद्धाची आठवण येते आणि देशात येताच भाजपाला या महापुरुषांचा विसर पडतो. असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

व्हिडीओ : भारताच्या हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘या’ सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

IDBI बँकेत 1036 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी !

10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय